जे. आर. डी. यांची जयंती गुणवत्ता दिन म्हणून साजरी

पिंपरी – जे. आर. डी. टाटा यांची 114 वी जयंती गुणवत्ता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. टाटा मोटर्सच्या पिंपरी येथील प्रकल्पातील ट्रेनिंग डिव्हिजन हॉस्टेल येथे झालेल्या कार्यक्रमात टाटा वाहनांमध्ये गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल कर्मचारी व समुहांचा सन्मान करण्यात आला.

टायटन कंपनीचे माजी सीईओ व टाटा सन्सचे स्वतंत्र सल्लागार एच. जी. रघुनाथ, पुणे प्रकल्प प्रमुख अलोक सिंग, जयदीप देसाई, व्ही. सुरेश, अनिल सिन्हा, चेतन चावला, अरुण बालिमनी, सरफराज मणेर, रवी कुलकर्णी, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष समीर धुमाळ आदी उपस्थित होते.

-Ads-

टाटा मोटर्स मॅन ऑफ द इयर नरेंद्र चिखले यांना बहाल करण्यात आला. रघुनाथ यांनी आपल्या मनोगतातून गुणवत्तेचे महत्त्व पटवून दिले. ग्राहकांच्या आवडीमध्ये होत चाललेला बदल पाहता गुणवत्तेच्या व्याख्येमध्ये बदल झाला असून ग्राहकाबद्दलचा स्नेह हे ब्रीद आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)