जेहानाबाद प्रशासनाने फेटाळला रविशंकर प्रसाद यांचा दावा

नवी दिल्ली: कॉंग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे बिहार मधील जेहानाबाद येथे निदर्शकांनी एक रूग्णवाहिका अडवली त्यातून दोन वर्षाच्या एका बालकाला रूग्णालयात दाखल केले जाणार होते पण ही रूग्णवाहिका अडवली गेल्याने त्यातच या बालकाचा मृत्यू झाला या बालकाच्या मृत्यु बद्दल राहुल गांधी काही उत्तर देणार काय असा सवाल आज केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भाजपच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्याविषयावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच जेहनाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र बंदमुळे असा काही प्रकार झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

जेहानाबादचे जिल्हाधिकारी अलोकरंजन घोष यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की कोणत्याही निदर्शकांनी तेथे कोणतीही रूग्णवाहिका अडवलेली नाही. सदर मुलाला रूग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना वाहन मिळण्यास उशिर झाला असल्याने ही घटना घडली असण्याची शक्‍यता आहे पण बंद निदर्शकांनी कोणतीही रूग्णवाहिका अडवलेली नाही. किंबा बंदमुळे झालेल्या ट्रॅफिक जाम मुळेही ही घटना घडलेली नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बिहार मध्ये भाजपचेच आघाडी सरकार सत्तेवर आहे. तेथील प्रशासनाच्या अधिकाऱ्यानेच केंद्रीय मंत्र्याचा हा दावा खोडून काढल्याने भाजपची पंचाईत झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)