जेसीबी साहित्य पुरस्काराची शॉर्टलिस्ट जाहीर

नवी दिल्ली:जेसीबी साहित्य पुरस्कारासाठी भारतीय लेखकांनी लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट अशा पहिल्या पाच प्रतिष्ठित कादंब-यांची शॉर्टलिस्टआज जाहीर करण्यात आली. विषय आणि रचना यांमध्ये वेगळेपणा असला तरी या कादंब-यांमधून एक महत्वाकांक्षा व्यक्त होते आणि ती म्हणजे, अत्यंत ताकदीने लिहिलेले प्रसंग आणि व्यक्तिरेखांमधून आजवरसमोर न आलेले जगव्यक्त करणे.या वर्षाच्या सुरुवातीलाच लाँच करण्यात आलेल्या जेसीबी साहित्य पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका ३१ मार्च २०१८पर्यंत पाठवायच्या होत्या. अनेक महिने चाललेले वाचन आणि मूल्यमापनानंतर, पाच सप्टेंबर रोजी ज्युरींनी दहा कादंब-यांची दीर्घसूची जाहीर केली. या दहा पुस्तकांमधून समकालीन भारतीय लेखनातील प्रचंड विविधतेचं दर्शन घडलं. त्यानंतर लघुसूची निश्चित करण्यासाठी ज्युरी पुन्हा एकदा एकत्र भेटले.

ज्युरींच्या निवेदनानुसार, “या पाचही कादंब-या, त्यांच्या वेगवेगळ्या मार्गाने, समृद्ध विचारशील मनुष्यांचा झपाट्याने बदलणा-या बाह्यजगाशी सुरू असलेल्या झगड्याचं वर्णन करतात. इतिहासातील आपल्या क्षणांची एक भव्य नोंद या कादंब-यांतून झाली असून आम्हाला वाटतं की, पुढील काही दशकं त्यांचं वाचन केलं जाईल.”

शॉर्टलिस्टकरण्यात आलेल्या या पाचही कादंब-यांच्या लेखकांना प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार असून, त्यांच्या अनुवादकांना पन्नास हजार रुपये मिळणार आहेत. अंतिम पुरस्कार, जो देशातील सर्वात श्रीमंत म्हणजे २५ लाख रूपयांचा आहे, तो विजेत्या कादंबरीच्या लेखकाला २४ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे, आणि विजेती साहित्यकृती जर अनुवादित असेल तर तिच्या अनुवादकालाही अतिरिक्त पाच लाख रूपये मिळणार आहेत.

जेसीबी साहित्य पुरस्कारासाठीची शॉर्टलिस्ट:

हाफ द नाइट इज गॉन(जुगरनॉट बुक्स) – अमिताभ बागची

जॅस्मिन डेज (जुगरनॉट बुक्स) – लेखक: बेन्यामिन, अनुवादक: शहनाज हबीब

पूनाची (वेस्टलॅंड पब्लिकेशन)- लेखक: पेरुमल मुरुगन, अनुवादक: एन. कल्याण रामन

ऑल द लाइव्ह्ज वी नेव्हर लीव्ह्ड (हॅचेट बुक पब्लिशिंग) – अनुराधा रॉय

लॅटिट्यूड्स ऑफ लाँगिंग (हार्परकोलिन्स पब्लिशर्स इंडिया) – शुभांगी स्वरुप.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
42 :thumbsup:
9 :heart:
0 :joy:
6 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)