जेसिका लाल हत्येतील दोषींची मुदतपूर्व सुटका नाही 

नवी दिल्ली: जेसिका लाल, प्रियदर्शिनी मट्टू आणि तंदूर हत्या प्रकरणातील दोषींची मुदतपूर्व सुटका करण्यास दिल्ली सेन्टेन्स रिव्ह्यू बोर्डाने नकार दिला. या दोषींनी मुदतपूर्व सुटकेसाठी केलेला अर्ज या बोर्डाने फेटाळून लावला आहे. दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखालील या फेरआढावा मंडळाने जेसिका लाल हत्या प्रकरणातील दोषी मनू शर्मा, प्रियदर्शिनी मट्टू हत्या प्रकरणातील दोषी संतोष सिंह आणि कुख्यात तंदूर हत्या प्रकरणातील दोषी सुशिल शर्माच्या अर्जांचा विचार केला आणि हे तिन्ही अर्ज फेटाळून लावले. सरकारी अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. या मंडळाने 22 दोषींच्या मुदतपूर्व सुटकेची शिफारस केली आहे. या 22 दोषींच्या चांगल्या वर्तवणूकीचा विचार करता त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मात्र अन्य 86 प्रकरणातील दोषींचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)