जेष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष केल्यास होणार कारवाई

मंचर- ज्येष्ठ नागरिकांचे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जाणार आहेत. जेष्ठांचा सांभाळ आणि त्यांच्या आरोग्याकडे मुलांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा मुलांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलावा लागेल, असा इशारा ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉमचे पुणे प्रादेशिक विभागाचे उपाध्यक्ष के. जी. वळसे पाटील यांनी दिला.
आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे कार्याध्यक्ष काशिनाथ वळसे पाटील यांची महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉमच्या पुणे प्रादेशिक विभागीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अवसरी बुद्रुक येथील मंदा अंनतराव हिंगे यांची फेस्कॉमवर सहसचिव म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्‍वर गावडे, संघाचे अध्यक्ष दशरथ भालेराव, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, उपाध्यक्ष बच्चू इनामदार, सचिव सोपान नवले, सहसचिव ए. एफ. इनामदार, कोषाध्यक्ष लक्ष्मण बोऱ्हाडे, मारुती शेवाळे, अनंत हिंगे, पोपट टेमगिरे, यशवंत इंदोरे, सीताराम भालेराव, यशवंत वायाळ, लक्ष्मण बोऱ्हाडे, ज्ञानेश्‍वर अरगडे, विट्टल महामुनी, दादाभाऊ चासकर, गंगाराम तोत्रे ए. एफ. इनामदार आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)