…जेव्हा ना.दिवाकर रावते संतप्त होतात

सातारा,दि.7 प्रतिनिधी- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे पदाधिकाऱ्यांवर संतप्त होण्याचा सिलसिला सोमवारी ही कायम राहिला. साताऱ्यात आयोजित बैठकीपुर्वीच ना.रावते यांनी नियोजनावरून प्रमुख पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले तर नुकतेच जिल्हाप्रमुखपदी विराजमान झालेले जयवंत शेलार यांचा जय महाराष्ट्र स्विकारताना ना.रावते यांनी शेलार यांचे खास शैलीत कान टोचले.

आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात एका हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ना.रावते कराड येथील कार्यक्रम करून या बैठकीला आले. बैठकीपुर्वी ते हॉटेलमधील दालनात थांबले तर खालच्या मजल्यावर असलेल्या हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी नियोजनामधील त्रुटी ना.रावते यांच्या कानावर पडताच ते तेथून तडक बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासोबत माजी जिल्हाप्रमुख हर्षल कदम व परिवहन विभागाचे अधिकाऱ्यांच्या वाहनाचा ताफा होता. तो ताफा तडक उलट्या दिशेने दुसऱ्या हॉटेलमध्ये पोहचला. त्यानंतर ना.रावते काही वेळ एका दालनात गेले तर दुसऱ्या बाजूला हर्षल कदम व चंद्रकांत जाधव त्या ठिकाणी असलेल्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करत होते. तर काही वेळात कदम तेथून बाहेर पडले व त्यांनी रावतेंचे स्विय सहाय्यकांच्या पाहुणचाराची व्यवस्था पाहण्यात दंग होते. तर दुसऱ्या बाजूला ना.रावते बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. त्यावेळी कदमांच्या जागी नियुक्ती झालेले हर्षल कदम यांनी ना.रावतेंना जय महाराष्ट्र केला. मात्र, त्यांनी शेलारांचा जय महाराष्ट्र स्विकारताना हात जोडले आणि शेलक्‍या शब्दात कान टोचले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर काही वेळात बैठकीला सुरूवात झाली. रावतेंनी विधानसभा मतदारसंघ निहाय पोलिंग बुथची माहिती पदाधिकाऱ्यांना घेतली. तसेच आता सर्व लोकसभा व विधानसभेच्या जागा स्वबळावर लढायच्या आहेत त्यामुळे शिवसैनिकांनी सर्व ताकदीने तयारी लागण्याच्या सूचना ही केल्या. दरम्यान यावेळी,
ना.दिवाकर रावतेंच्या सातारा दौऱ्यात प्रादेशिक परिवहन विभाग तथा आरटीओच्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. ना.रावते येण्यापासून ते जाण्यापर्यंत तसेच राजकीय बैठक असताना देखील त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना खडा पहारा द्यावा लागल्याचे चित्र दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)