जेव्हा नगरसेविका रमतात मूर्ती घडवण्यात

सांगवी – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्‍त (भा. प्र. से.) यांच्या सहमतीने एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसीए) ने पिंपरी-चिंचवड मधील 635 शाळांच्या शिक्षकांना शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचे मोफत प्रशिक्षण दिले. दुसऱ्या टप्प्यात सांगवी परिसरातील 29 शिक्षकांनी भाग घेतला. प्रशिक्षणासाठी नगरसेविका शारदा सोनवणे उपस्थित होत्या. केवळ उद्‌घाटनासाठी आलेल्या नगरसेविका शारदा सोनवणे यांना हा उपक्रम इतका आवडला की त्या स्वतः शाडूची मूर्ती बनवण्यात रमल्या व त्यांनी संपूर्ण मूर्ती बनवली.
इसीए अध्यक्ष विकास पाटील यांनी शिक्षकांना उपक्रमाची माहिती व आवश्‍यकता समजावून सांगितली. कार्यशाळेस नगरसदस्य आणि सदस्या उपस्थित होते. प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील दोन शिक्षक कार्यशाळेसाठी नियुक्‍त केले होते. नगर सदस्य शारदा सोनवणे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. इनरव्हील खडकी क्‍लब शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी झाला होता. महापालिकेच्या सर्व शाळांतून उत्तम साथ मिळाली.
शिक्षकांनी आपल्या शाळेच्या हिश्‍श्‍याची शाडू माती नेण्यासाठी कापडी पिशवी आणली होती. इसीएने शाडू माती विनामूल्य दिली. शारदा सोनावणे, नगर सदस्य हर्षल ढोरे, पर्यावरण तज्ज्ञ विकास पाटील, इनरव्हीलच्या खडकीच्या अध्यक्ष वंदना जैन व माधुरी गोडबोले, मुख्याध्यापिका श्रीमती रेहना अत्तार, रोहिणी जोशी, सुजाता खणसे, मूर्ती प्रशिक्षक विश्वास फडणीस, प्रभाकर मेरुकर, दत्तात्रय कुमठेकर, सुभाष चव्हाण, सिकंदर घोडके, इंद्रजीत चव्हाण, स्मिता दुसाणे, मोनिका शर्मा आणि विविध शाळांचे 68 शिक्षक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)