वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोणाच्याही अंत्ययात्रेत दुःखाचे वातावरण असते. पण काही वेळेस असे काही घडते की, ज्यामुळे चेहऱ्यावर हास्य उमटते. असेच काहीसे झाले ते अमेरिकेच्या सिनेटर जॉन मॅककैन यांच्या प्रार्थना सभेवेळेस.

प्रार्थनासभेसाठी माजी राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांना पहिल्या ओळीत बसविण्यात आले होते. याच वेळी माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश यांनी त्यांची पत्नी लॉरा बुश यांच्या हातातून एक टॉफी घेऊन ती माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांच्या हातात दिली. हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आला. शिवाय टॉफी घेतल्यानंतर मिशेल त्यांना धन्यवाद म्हणतानाही दिसत आहेत. त्यावेळेचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, बराक ओबामा आणि जॉर्ज डब्लू बुश हे दोघेही वेगवेगळ्या  पक्षाचे सर्मथक आहेत. बराक ओबामा हे डेमोक्रेटिक पक्षाचे नेते तर बुश रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. परंतु, बुश आणि मिशेल ओबामा यांच्यात मैत्रीचे नाते असून अनेक वेळा प्रसिद्धी माध्यमातून दिसले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)