…जेव्हा ऑफिसमधून महिला विस्तार अधिकाऱ्याची पर्स होते चोरी

नांदेड- नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नेहमीच चर्चेत राहतो. आता एका नविन घटनेने हा विभाग चर्चेत आला आहे. चक्क ऑफिसमधून महिला विस्तार अधिकारी असलेल्या महिलेची बॅगच चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, सोमवारी समाजकल्याण विस्तार अधिकारी असणाऱ्या महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. महिलेने पर्स चोरली गेल्याचे लक्षात येताच शोधाशोध घेतली. विभागात लावलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमरेत पर्स चोरी करत असताना चोर कैद झाला. यावरून त्या चोराची शोधाशोध घेतली असता तो तेथेच आढळून आला. त्याच्याकडून पर्स घेऊन सोडून देण्यात आले.

समाज कल्याण विभागात या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिला कर्मचाऱ्याची पर्स चोरली. सदरील पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्या महिला कर्मचाऱ्याने पर्स चोरली गेल्याची माहिती सहकारी कर्मचाऱ्यांना सांगितली. यावरून एकच गोंधळ उडाला. विभागात लावण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमरेची फुटेज तपासली असता चोर स्पष्ट दिसून येत होता. विभागाच्या शेजारी असणाऱ्या शौचालयात हा चोर आढळून आला त्याने शौचालयात जाऊन पर्समध्ये असणारे सर्व पैसे काढून पर्स बाहेर फेकून दिली. यावेळी विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्या चोरास सी.सी.टी.व्ही. फुटेज दाखविले असता चोरी केल्याचे कबुल केले. यावेळी त्याने पर्स आणि त्यातील पैसे त्या महिला कर्मचाऱ्यास परत केले. यावेळी जमावाने त्या चोरट्यास चांगलाच मार देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)