जेवेढे उच्चांक -तेवढेच नीचांक अशावेळी काय करायचे ? (भाग-२ )

एनएसई 100 मधील पहिल्या 100 कंपन्यांपैकी जवळजवळ 24 कंपन्यांच्या शेअर्सनी नवीन उच्चांक नोंदवले तर 31 कंपन्यांच्या शेअर्सनी नवीन न्यूनतम पातळी गाठली. अशा वेळी काय केले पाहिजे ?

आता त्या तक्त्‌यामध्ये दिलेला पहिला रकाना पहा, ज्यामध्ये महिना व साल नमूद केलेलं आहे, ते दर्शवतं की त्या कंपनीच्या शेअर्सच्या भावानं कोणत्या वेळेस टेक्‍निकल चार्टवर पॉझिटिव्ह ब्रेकआऊट दिलेलं होतं. आणि आश्‍चर्याची बाब म्हणजे निफ्टी 50 या निर्देशांकांनं याच अभ्यासानुसार मे 2016 ला पॉझिटिव्ह ब्रेकआऊट दिलं होतं.
द वॉल स्ट्रीट जर्नलचे संस्थापक व डाऊ जोन्स आणि कंपनीचे सह-संस्थापक चार्ल्स डाऊ यांचा दुसरा सिद्धांत सांगतो ऍव्हरेजेस म्हणजे सरासरी बद्दल.

price verages discount everything अगदी शब्दशः अर्थ निघतो प्रत्येक गोष्ट ही किमतीच्या सरासरीमध्ये वटवली जाते. म्हणजेच बाजारातील शेअरच्या किंमतींची सरासरी सर्व उपलब्ध माहिती प्रतिबिंबित करते. बाजारातील एखाद्या कंपनीच्या शेअर्सचे भाव हे सर्व आशा, भीती आणि अपेक्षा यांचं प्रतिनिधित्व करतात. याचं कारण की एखाद्या कंपनीचे उत्तम अथवा खराब निकाल जाहीर होण्याआधी ते कंपनीच्या प्रवर्तकांना किंवा बोर्ड सभासदांना किंवा ऑडिटर्सना माहीत नसतील का ? त्यामुळं ही मंडळी आधीच प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे त्या शेअर्सची खरेदी अथवा विक्री करणं स्वाभाविकच आहे. अशा गोष्टी त्या शेअर्सच्या किमतीत उतरतात किंवा प्रतिबिंबित होतात. त्यामुळं जर आपल्या साधनांद्वारे जर अशा हालचालींवर (प्राईस मूव्हमेंट्‌सवर) बारीक नजर ठेवल्यास बाजारातून उत्तम नफा मिळवता येऊ शकतो.

-Ads-

आपल्या अभ्यासानुसार आणि मागील कांही लेखांत वारंवार लिहिलं आहे, तब्बल 11 कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजार भावांनी 2009 मध्येच या शेअर्सच्या खरेदीबद्दल खुणावलं होतं, जरी निर्देशांकानं मात्र 2016 मध्ये पॉझिटिव्ह ब्रेकआऊट दिलं होतं. त्यामुळं बरेच लोक म्हणतात की एखादा शेअर खरेदी करण्यासाठी बाजार पडण्याची वाट पाहू. माझ्यामते या गोष्टीला तरी अर्थ नाही व हे वरील उदाहरणांवरून अधोरेखीतच होतंय. त्यामुळं ज्यांना बाजारातून दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करून मोठा नफा पदरात पडून घ्यायचाय त्यांच्यासाठी यां गोष्टी नक्कीच लाभदायक आहेत.

आता वळूयात बाजाराच्या पुढील दिशेकडं. आपल्या उद्दिष्ट्‌यानुसार निफ्टी 50 चं पाहिलं उद्दिष्ट 11200 हे पार झालेलंच आहे तर नंतरचं उद्दिष्ट्‌य हे 11700 वाटतंय, त्यासाठी 11500 हा अडथळा तर 11400, 11230 व 1160 हे आधार टप्पे संभवतात. एकूणच, निराशेकडं बोट दाखवणाऱ्या जागतिक घडामोडी, अमेरिकी डॉलरच्या 70 रुपयांच्या वर गेलेली रुपयाची किमत या गोष्टी नफेखोरीस प्राधान्य देण्यास सुचवत आहेत तर अपेक्षेपेक्षा चांगले आलेले पहिल्या तिमाहीचे निकाल हे निवडक कंपन्यांच्या शेअर्सच्या भावाकडं आशेनं पाहावयास प्रवृत्त करत आहेत. अशा परिस्थितीत थोडा संयम राखणंच योग्य.

जेवेढे उच्चांक -तेवढेच नीचांक अशावेळी काय करायचे ? (भाग-१ )

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)