जेवणाचा अतिरेक करू नका…

तुम्हाला भूक लागली की तुम्ही काहीही खायला तयार होत असाल तर स्वत:वर ताबा ठेवण्याची गरज आहे. अशानेच कॅलरीज वाढतात आणि मग शरीरावरील ताबा सुटतो. त्यामुळे नको त्या आजारांनाही निमंत्रणही मिळते.
अनावश्‍यक खाणे टाळण्यासाठी काही टिप्स
* उगाचच काहीतरी तोंडात टाकण्याची सवय असेल तर अनेकदा शरीराला गरज नसल्यावरही आपण खातो. सर्वात आधी ही सवय तोडा.
* व्यायामात रस असू द्या. कंटाळा असेल तर रोज निरनिराळे व्यायाम करा. व्यायामादरम्यान आणि नंतर भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे तुमचे पोट भरलेले राहील.
* नाश्‍ता, लंच आणि डिनरच्या 15 ते 20 मिनीटांआधी ग्लासभर पाणी घ्या याने भूक कमी होईल
* तेलकट, तुपकट खाण्याऐवजी फळ, दूध कडधान्य असे पदार्थ घ्या, याने पोटही भरेल आणि अशक्‍तपणा वाटणार नाही
* शक्‍य असल्यास जेवण्याच्या अर्ध्या तासाआधी व्यायाम करा, याने हेव्ही नाश्‍ता टाळता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)