जेरेमी व गुलामचे विक्रमांसह सुवर्णपदक

खेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; अपेक्षेप्रमाणे शानदार कामगिरी

पुणे: मिझोरामचा जेरेमी लालरिन्हुंगा व उत्तराखंडचा गुलाम नवी यांनी विक्रम नोंदवित वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांनी अनुक्रमे 17 वषार्खालील व 21 वषार्खालील मुलांच्या गटातील 67 किलो वजनी गटात हे यश मिळविले.

आशियाई कनिष्ठ स्पर्धेत पदकांची लयलूट करणा-या जेरेमी याने स्नॅचमध्ये 122 किलो वजन उचलून गुलाम नवी याचा 112 किलो हा विक्रम मोडला. त्याने क्‍लीन व जर्कमध्ये 156 किलो आणि एकूणात 278 किलो वजन उचलले. अरुणाचल प्रदेशच्या मार्किओ तारिओ याने स्नॅचमध्ये 104 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 142 किलो असे एकूण 246 किलो वजन उचलले आणि रौप्यपदक पटकाविले. आसामच्या त्रिदीप बरुआ याने ब्रॉंझपदक घेतले. त्याने स्नॅचमध्ये 108 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 127 किलो असे एकूण 235 किलो वजन उचलले.

मुलांच्या 21 वषार्खालील 67 किलो गटात गुलाम याने स्नॅचमध्ये 120 किलो वजन उचलीत स्वत: नोंदविलेला 112 किलो हा विक्रम मोडला. त्याने क्‍लीन व जर्कमध्ये 159 किलो असे एकूण 279 किलो वजन उचलले आणि सोनेरी यश संपादन केले. एकूण वजन उचलण्याचाही विक्रम त्याने मोडला. यापूर्वी या स्पर्धेत जेरेमी याने युवा राष्ट्रीय स्पर्धेत 278 गुणांची नोंद केली होती. मिझोरामच्या जेरेमी याला या विभागात रौप्यपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये 122 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 156 किलो असे एकूण 278 किलो वजन उचलले. आंध्रप्रदेशच्या के.नीलम राजू याला ब्रॉंझपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये 112 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 146 किलो असे एकूण 258 किलो वजन उचलले.

मुलांच्या 17 वषार्खालील 61 किलो गटात मिझोरामच्या झाकुमा याने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने स्नॅचमध्ये 114 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 140 किलो असे एकूण 254 किलो वजन उचलले. त्याचाच सहकारी जेकब व्हान्लाल्तालुंगा याने स्नॅचमध्ये 114 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 139 किलो असे एकूण 253 किलो वजन उचलले आणि रौप्यपदक पटकाविले. स्नॅचमध्ये 98 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 129 किलो असे एकूण 227 किलो वजन उचलले. त्याला ब्रॉंझपदक मिळाले.

मुलांच्या 21 वषार्खालील विभागातील 61 किलो वजनी गटात जेकब व्हान्लाल्तालुंगा याने सुवर्णभरारी केली. त्याने स्नॅचमध्ये 114 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 139 किलो असे एकूण 253 किलो वजन उचलले. अरुणाचल प्रदेशच्या चारु पेसी याने स्नॅचमध्ये 97 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 130 किलो असे एकूण 227 किलो वजन उचलले. त्याला रौप्यपदक मिळाले. मिझोरामच्या लालहुंतारा याला ब्रॉंझपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये 95 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 126 किलो असे एकूण 221 किलो वजन उचलले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)