‘जेम्स बॉण्ड’साठी डॅनियलला मिळाली ‘एवढ्या’ कोटींची ऑफर

हॉलीवूड अभिनेते डॅनियल क्रेग हाच यापुढंही ‘जेम्स बॉण्ड’च्या भूमिकेत दिसणार आहे. जेम्स बॉण्डच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरच तसे ट्वीट करण्यात आले आहे. डॅनियल क्रेग पाचव्यांदा बॉण्ड साकारणार असून नव्या सिरीजसाठी त्याला तब्बल ४५० कोटींची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे.


२००५ मध्ये पिअर्स ब्रॉसन हा बॉण्डच्या भूमिकेत होता तर २००६ मध्ये आलेल्या कॅसिनो रॉयलमध्ये क्रेग सर्वप्रथम बॉण्ड बनला. त्यानंतर त्याचे आणखी तीन बॉण्डपट आले. क्रेग याच्यानंतर ‘बॉण्ड’ कोण साकारेल याची चर्चा जोरात होती. त्यात इद्रिस एल्ब, टॉम हिडलस्टन व एडान टर्नर यांची नावे आघाडीवर होती. मात्र पुन्हा क्रेगलाच पसंती मिळाली आहे.

इतकचं नव्हे, डॅनियल क्रेग हाच या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता देखील असणार आहे. यामुळं तो चित्रपटाच्या नफ्यातील भागीदार असेल. तसे झाल्यास डॅनियल सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत दाखल होणार आहे. या आधीच्या बॉण्ड सिरीजमधली ‘स्पेक्टर’साठी त्याने ३३३ कोटी रुपये मानधन घेतले होते

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)