जेनेलियाने पोस्ट केला रितेश देशमुखच्या पेंटिंगचा पहिला फोटो

बॉलिवूडमधील अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने नुकताच आपला 31वा वाढदिवस कुटुुंबियांसोबत साजरा केला. त्यानंतर तिने पती आणि अभिनेता रितेश देशमुख याच्या अदाकारिने त्याच्या चाहत्यांना मोहित करून दिले. जेनेलियाने एक सुंदर असे पेंटिंग आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, जे की रितेशने बनविले आहे.

रितेश देशमुखचा अभिनय तर सर्वांनी पाहिलाच आहे. आता त्याच्यातील आणखी एक कला सर्वांसमोर आली आहे. तो अभिनयाबरोबरच पेंटिंग करण्यातही तरबेज आहे. जेनेलियाने एक पेंटिंग पोस्ट करत लिहिले की, “मला माहित आहे की, मी असे काही पोस्ट केल्याने तुम्हाला जरा कुतुहल वाटेल. पण आभार मानने एक अशी गोष्ट आहे, ज्याला आपण महत्त्व देत नाही. मला तुमच्यावर गर्व आहे आणि जर त्याचा अर्थ घराच्या गच्चीवर जाउन मोठयाने ओरडणे असा असेल तर एका क्षणासाठी मी तेही करायला तयार आहे.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावरून हे निश्‍चित होते की, आपल्या पतीच्या या कलरफुल आर्ट वर्कवर जेनेलिया खूपच आनंदी आहे. दरम्यान, रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा 2012 मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला आता दोन मुले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)