जेना म्हणतात, राहुल गांधींना एक्‍स्पोज करू

भुवनेश्‍वर – कॉंग्रेसचे येथील नेते व माजी केंद्रीय मंत्री श्रीकांत जेना यांची काल कॉंग्रेस मधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांना आपण लवकरच एक्‍स्पोज करू असे म्हटले आहे. आपण त्यांच्या विषयीची माहिती जाहीर केल्यानंतर त्यांना तोंड दाखवणेही अवघड बनेल असे त्यांनी म्हटले आहे.

जेना यांची पक्ष विरोधी कारवायांबद्दल कालच पक्षातून हकालपट्टी झाली आहे. राहुल गांधी हे 25 जानेवारीला ओडिशाच्या दौऱ्यावर येत आहेत त्याच दिवशी आपण त्यांना एक्‍स्पोज करू, असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)