बंगळुरू – भारतीय जनता पक्षाने आमच्या 32 आमदारांशी संपर्क साधून त्यांना शंभर कोटी रूपये प्रत्येकी देण्याची ऑफर दिली आहे असे कुमारस्वामी यांनी सांगितले. दरम्यान कॉंग्रेसच्याही दोन आमदारांना मंत्रीपदाची ऑफर देऊन फोडण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. दरम्यान कॉंग्रेसचा एक आमदार बेपत्ता असून तो कर्नाटकातील रेड्डुीबंधुंच्या प्रभावाखाली असल्याने तो त्यांच्या संपर्कात गेला असल्याचा संशय आहे त्याचा शोध सुरू आहे असे कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

कॉंग्रेस आणि जेडीएसकडे पुर्णबहुमताचा आकडा असताना भाजप बहुमताचा दावा कशाच्या आधारावर करते आहे असा प्रश्‍न आज पत्रकारांनी भाजपचे निरीक्षक व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना विचारला असता ते म्हणाले की नैसर्गिक स्वरूपातच हे काम होईल. कॉंग्रेस आणि जेडीएस यांनी जे अनैसर्गिक गठबंधन केले आहे त्यावर त्यांच्याच पक्षाचे अनेक आमदार नाराज आहेत ते आमच्या मदतीला येतील असा दावा त्यांनी केला.

कर्नाटकात 222 जागांवर मतदान झाले आहे. त्यातील बहुतेक सगळे निकाल जाहीर झाले असून आता बहुमतासाठी 112 जागांचा आकडा पुरेसा ठरणार आहे. एका अपक्ष आमदाराने भाजपला पाठिंबा जाहींर केल्याने 104 जागा मिळवणाऱ्या भाजपचे संख्याबळ 105 झाले आहे. तरीही त्यांना अद्याप सात जागा कमी पडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)