जेट एयरवेजच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; एकाला अटक 

मुंबई – जेट एयरवेज कंपनीच्या विमानाला एका तरुणाने फोनवरून बॉम्बने उडविण्याची धमकी दिली आहे. हे विमान कोलकत्ताहून मुंबईला जात होते. यासंबंधीची माहिती मिळताच सीआईएसएफच्या जवानांनी या तरुणाला अटक केली आहे. दरम्यान, या तरुणाबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

जेट एयरवेजच्या कोलकत्ताहून मुंबईला जाणाऱ्या विमानाने टेक ऑफ करताच तरुणाने एका व्यक्तीला फोन करून बॉम्बस्फोटासंबंधी वक्तव्य केले. हे वक्तव्य त्या तरुणाच्या सहप्रवाशाने ऐकले व यासंबंधीची माहिती त्याने विमानातील क्रू मेंबर्सला दिली. यानंतर सीआईएसएफच्या जवानांनी या तरुणाला अटक केली असून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)