जेट एअर वेजला तोटा 

संग्रहित फोटो

मुंबई – विमानसेवेत आघाडीची खासगी कंपनी असणाऱ्या जेट एअरवेजची आर्थिक घडी विस्कटत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जानेवारी ते मार्च 2018 या कालावधीत कंपनीला 1036 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे उघड झाले आहे. मागील वर्षेत याच तिमाहीत कंपनीकडून 603 कोटी रुपयाचा नफा नोंदवला होता. कंपनीची आताची परिस्थीती गंभीर असून महसूल वाढीच्या क्षमतेवर कंपनीचे भविष्य तारणार आहे. असे निरीक्षण जेटच्या लेखापालेंनी व्यक्त केले आहे.

मागील 11 तिमाहीमध्ये जेटला प्रथमच तोटयाला तोंड द्यावे लागत आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या होत असणारे अवमूल्य ही जेटच्या तोटयाला म्हत्त्वाची कारणे असल्याचेही सांगण्यात येत आहे. सन 2017-2018 या आर्थिक वर्षात कंपनीला एकूण 767.62 कोटी रुपयाचा तोटा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात या कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असल्याची नोंदही करण्यात आली आहे. तर 1,482 कोटी रुपयांचा नफा झाल्याचेही सांगण्यात आले आहे. तोटयाची जाणीव होताच कंपनीने अगोदरपासून खर्चात कपात, उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहे. तरीही याचा फायदा जेटला किती प्रमाणात होणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)