जेट एअरवेज सेबीच्या राडारवर 

आर्थिक स्थिती खालावली: पहिल्या तिमाहीचा ताळेबंद पुढे ढकलला

नवी दिल्ली: जेट एअर वेजची आर्थिक स्थिती खालावली असल्यामुळे या कंपनीच्या शेअरचे भाव 52 आठवड्याच्या निचांकी पातळीवर गेले आहेत. कंपनीला तातडीने 8 हजर कोटी रुपयाचे भांडवल लागणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. त्यातच कंपनीने पहिल्या तिमाहिचा ताळेबंद जाहीर करणे पुढे ढकलल्यामुळे आता या कंपनीकडे बाजार नियंत्रक सेबीने लक्ष घातले आहे.

-Ads-

कंपनीच्या ऑडिटरनी तोळेबंदातील काही बाबीवर शंका व्यक्त केल्याचे बोलले जाते. त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळलने 9 ऑगस्ट रोजी ताळेबंद जाहीर करणे पुढे ढकलले असल्याचे शेअर बाजारांना कळविल्या नंतर शेअर बाजार नियंत्रकांनी या प्रकाणात लक्ष घातले असल्याचे वृत आहे. त्याचबरोबर ताळेबंद जाहीर करण्याचा निर्णय पुढे ढकलल्यानंतर शेअरबाजारांनीही कंपनीकडे माहीती मागीतली आहे.

मुंबई शेअर बाजाराने म्हटले आहे की, कंपन्यांनी जी माहिती देणे अपेक्षित असे ती दिलेली नाही. कंपनीने संचालक मंडळाने ताळेबंद जाहीर करने पुढे ढकलले असल्याचे सांगीतले आहे. मात्र संचालक मंडळाची बैठक कधी आणि कुठे झाली हे सांगितलेले नाही.

काल या कंपनीने शेअर बाजाराना फक्‍त एवढेच सांगितले की, काही बाबीचे स्पष्टीकरण न झाल्यामुळे कंपनीच्या ऑडिटरनी ताळेबंद संचालक मंडळाकडे न पाठविण्याची शिफारस केली. ताळेबंदाशीवाय आणखी कोणत्या बाबीवर संचालक मंडळाने चर्चा केली का? असेही मुंबई शेअर बाजाराने कंपनीला विचारले आहे. जर चर्चा झाली असेल तर त्याची माहिती का दिली गेली नाही असे शेअर बाजाराचे म्हणणे आहे.

ऑडिट समितीच्या अध्यक्षानी राजीनामा दिला असल्याचे माध्यामात आले आहे. त्यावरही कंपनीकडून प्रतिक्रिया शेअरबाजारांनी
मागितली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)