जेट एअरवेजच्या शेअरची घसरण चालूच

संग्रहित फोटो

गुंतवणूकदारांचे लक्ष 27 ऑगस्टला होणाऱ्या संचालकांच्या बैठकीकडे

मुंबई: मोठया कर्जभाराने आर्थिक स्थिती डगमगलेल्या जेट एअरवेजच्या शेअरच्या भावात आजही 3 टक्‍क्‍याची घट झाली. कंपनी खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कंपनी आपल्या मालकीची सात विमाने भाड्याने देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. याबाबत ट्रुजेट या हवाई सेवेबरोबर कंपनीच्या वाटाघासाठी सुरू असल्याचे समजते. खर्चात कपातीबरोबरच महसूल वाढीकरिता जेट एअरवेज हे पाऊल उचलणार असल्याचे समजते. ही सात विमाने काही कर्मचारी तसेच देखभाल आणि विमाछत्रासह दिली जाण्याची शक्‍यता आहे.

जेट एअरवेजच्या ताफ्यात एटीआर जातीची सध्या 15 विमाने आहेत. ट्रुजेटबरोबरचा भाडेकराराचा व्यवहार चालू महिनाअखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. ट्रजेटबरोबर हा व्यवहार नजीकच्या भविष्यात आणखी अधिक विमानांसाठी आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी होण्याची शक्‍यता आहे. या व्यवहाराबाबत जेट एअरवेजने अद्याप अधिकृतपणे काहीही स्पष्टीकरण दिले नसले तरी ट्रुजेटच्या प्रवक्‍क्‍याने मात्र तशी शक्‍यता वर्तविली आहे. तूर्त सात विमाने अल्प कालावधीसाठी भाडयाने घेतली जाण्याचा पर्याय असल्याचे या प्रवक्‍त्याने वृत्तसंस्थेला सांगितले.

आखातातील कंपनी एतिहादबरोबर भागीदारी असलेल्या जेट एअरवेजने मार्च 2018 अखेर संपलेल्या तिमाहीत 1,000 कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे. एप्रिल-जून तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करणे लांबणीवर टाकणाऱ्या जेट एअरवेजने आता त्यासाठी 27 ऑगस्ट ही तारीख निश्‍चित केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक त्या दिवशी होणार असून त्यातच जून 2018 अखेर संपलेल्या तिमाहीचे वित्तीय कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.

पूर्वनियोजित सूचनेप्रमाणे 9 ऑगस्ट रोजी कंपनीचे तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर होणार होते. ट्रुजेटबरोबरच्या संभाव्य व्यवहाराबाबत भांडवली बाजाराने जेट एअरवेजकडे विचारणा केली आहे. भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या जेट एअरवेजला या व्यवहाराची कल्पना बाजाराला देणे नियमानुसार आवश्‍यक असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)