जेटली म्हणतात, मल्ल्याला कधीच अपॉईंटमेंट दिली नाही

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांची भेट घेतल्याचा मल्ल्याचा दावा फेटाळून लावला आहे. मल्ल्या याला भेटीसाठी 2014 पासून कधीच अपॉईंटमेंट दिली नाही. संसदेत माझ्याशी बोलण्यासाठी त्याने राज्यसभा सदस्यत्वाचा गैरवापर केला, असे जेटली यांनी म्हटले आहे.

मल्ल्याने केलेला दावा खोटा आहे. त्यामध्ये सत्याचा लवलेश नाही. मी त्याला अपॉईंटमेंट दिली नसल्याने भेटीचा प्रश्‍नच उद्भवत नाही. अर्थात, राज्यसभेचा सदस्य म्हणून संसदेत उपस्थित असायचा. एकदा संसदेतील माझ्या दालनात मी जात असताना त्याने मला गाठले. मी सेटलमेंटची ऑफर देतो, असे एक वाक्‍य त्याने चालत-चालतच उच्चारले. त्याने त्याआधी ऑफर्ससंदर्भात केलेल्या थापेबाजीची पूर्ण माहिती मला होती. त्यामुळे त्याला अधिक बोलू न देता माझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नसल्याचे मी म्हटले. संबंधित बॅंकांना ऑफर्स देण्याची सूचना मी केली, अशी प्रतिक्रिया जेटली यांनी फेसबुक ब्लॉगवरून दिली.

मल्ल्याला देशाबाहेर जाण्याची परवानगी का दिली? – कॉंग्रेस
जेटली यांच्या भेटीसंदर्भात मल्ल्याने केलेल्या दाव्यानंतर कॉंग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला. मल्ल्यासारख्यांना देशाबाहेर जाऊ देण्यात सरकारचा पूर्ण सहभाग आहे. मल्ल्याने घेतलेल्या भेटीगाठींमध्ये काय घडले ते जाणण्याची देशाला इच्छा आहे. मल्ल्याला देशाबाहेर जाण्याची परवानगी का आणि कशी दिली याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)