जेटलींवरच्या आरोपांसाठी कॉंग्रेसची चिथावणी

संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांचा पलटवार

नवी दिल्ली – मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या भेटीच्या मुद्दयावरून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची कॉंग्रेसची मागणी चिथावणी दिल्याने करण्यात आली असल्याची टीका भाजप नेत्या निर्मला सितारामन यांनी केली. “युपीए’ सरकारच्या काळातल्या वशिलेबाजी आणि झुकते माप देण्यापासून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठीच ही रणनिती खेळली जात असल्याची टीकाही सितारामन यांनी केली.

संसदेच्या आवारामध्ये मल्ल्या आणि जेटली यांच्यात झालेल्या अल्पशा संभाषणाला वाढवून दाखवले जात आहे आणि हे संभाषण गांभीर्याने घेण्यासारखे नाहीच असे या प्रकरणावरील प्रतिक्रियातूनच दिसून येते आहे. जेटली यांनी मल्ल्याबरोबरच्या संभाषणाबाबत स्पष्टिकरण दिले आहे. मल्ल्याने आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या विशेषाधिकाराचा कशाप्रकारे गैरवापर केला, हे जेटली यांनी स्पष्ट केले आहे.

जेटली आणि मल्ल्या यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बोलताना आपण बघितल्याचे कॉंग्रेस खासदार पी.एल.पुनिया यांनी म्हटले होते. या दाव्याच्या पुष्ट्यार्थ सीसीटिव्ही फुटेज तपासण्याची मागणीहीही पुनिया यांनी केली होती. त्यावर सितारामन यांनी “या व्हिडीओमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगपण असेल.’ अशी प्रतिक्रिया दिला.

“युपीए’ काळात मल्ल्याला मदत करण्यासाठी रिझर्व बॅंक ऑफ इंडिया आणि स्टेट बॅंक ऑफ इंदियाला पत्रे पाठवली गेली होती. एका कंपनीला लाभ होण्यासाठी कशी मदत केली गेली, हे सगळे उजेडात येत आहे. हे सगळे कोणाच्या कालखंडात झाले, असा सवाल सितारामन यांनी विचारला.

जेटली आणि मल्ल्या यांच्यातली भेट औपचारिक नव्हती. त्यामुळे त्यावरून वाद सुरू होणे योग्य नाही.ाअपण केवळ अर्थमंत्री जेटली यांना वाटेतच भेटल्याची सावरसावरही मल्ल्याने आज केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)