जेटलींनी इंदिराजीची हिटलरशी केलेली तुलना मुर्खपणाची

कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांची टीका


1980 साली इंदिराजींना पुन्हा निवडून देऊन आणिबाणीचा विषय संपवला

नवी दिल्ली – अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आणिबाणीच्या मुद्‌द्‌यावरून दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मन हुकुमशहा हिटलर याच्याशी केली आहे. त्यावरून ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी जेटली यांच्यावर जोरदार पलटवार केला असून जेटली यांची ही तुलना मुर्खपणाची व अवमानकारक आहे असे म्हटले आहे.

सध्याच्या ऍरोगंट सरकारमुळे आणि हुकुमशाही प्रवृत्तीच्या पंतप्रधानांमुळेच देशातील घटनात्मक संस्थांचे अवमुल्यन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी यांनी सन 1975 साली लागू केलेली अीाणबाणी हा एक अपवादात्मक प्रकार होता आणि त्याबद्दल स्वता इंदिरा गांधी यांनीही खेद व्यक्त केला आहे. पण त्यावरून त्यांनी इंदिराजींची हिटलर यांच्याशी केलेली टीका अनठायी आहे. जेटली ज्या संघ भाजपच्या शाळेतून पुढे आले आहेत त्यांनी नेहमीच हिटलरचे समर्थन केले आहे असे शर्मा यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंदिरा गांधी या त्यांच्याकाळातील एक महान नेत्या होत्या. लोकशाहीं मार्गाने निवडून आलेल्या त्या एक लोकप्रिय नेत्या होत्या असेही शर्मा यांनी यावेळी नमूद केले. लोक इंदिराजींना आपले दैवत मानतात त्यांचा अवमान करण्याचा संघ भाजप नेत्यांना अधिकार नाहीं. इंदिराजींच्या काळातच बांगलादेश स्वतंत्र केला गेला आणि त्यांच्या काळातच भारत अण्विक शक्ती झाला ही बाब लोकांच्या चांगल्या लक्षात आहे. लोकांनी आणिबाणीचा विषय 1980 साली इंदिरा गांधी यांना पुन्हा पुर्ण बहुमताची सत्ता देऊन संपुष्ठात आणला आहे आता त्यावरून पुन्हा पुन्हा चर्चा उपस्थित करण्याची गरज नाहीं असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)