जेटलींना खोटे बोलण्याची सवय : ललित मोदींनीही साधला निशाणा

नवी दिल्ली – विजय मल्ल्या यांनी विदेशात पळून जाण्यापुर्वी अरूण जेटली यांची भेट घेतली आहे हे अनेकांना माहिती आहे पण तरीही जेटली हे खोटे बोलत आहेत कारण त्यांना तशी सवयच आहे अशी प्रतिक्रीया आयपीएलचे माजी कमिनशनर ललित मोदी यांनी दिली आहे. त्यांनी जेटली यांना साप अशीही उपमा आपल्या ट्विटर अकौंटवर दिली आहे.

कर्जबुडव्या विजय मल्ल्या हा विदेशात पळून जाण्यापुर्वी अरूण जेटली यांना भेटला होता व त्याने आपण विदेशात जात आहोत अशी कल्पना जेटली यांनी दिली होंती असा खळबळजनक दावा खुद्द मल्ल्या यानेच लंडनमध्ये दिल्यानंतर भारतात त्यावरून सध्या जोरदार वादळ उठले आहे. त्यात आता ललित मोदीनेही उडी घेतली आहे.

आपल्या ट्विटर अकौंटवर ललित मोदीने म्हटले आहे की, मल्ल्या याने पळून जाण्यापुर्वी जेटलींची भेट घेतली होती हे पुर्ण सत्य आहे. त्यांनी हे सत्य मान्य केले पाहिजे. अनेकांनी त्यांना मल्ल्यांशी बोलताना आणि त्यांची भेट घेताना पाहिले आहे मग हा खोटेपणा का? असा सवाल उपस्थित करून ललित मोदीने म्हटले आहे की जेटली यांना खोटं बोलण्याची सवयच जडली आहे.

सापाकडून तुम्ही आणखी वेगळे काय अपेक्षित धरू शकता असेही त्याने यात नमूद केले आहे. या ट्‌विटर मध्ये त्याने साप हा शब्दप्रयोग न वापरता सापाचे चित्र त्या संदेशात वापरले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)