जेटलींच्या सुरक्षितेखालीच विजय मल्ल्या परदेशात फरार – राहुल गांधी

राहुल गांधी : अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नवी दिल्ली – मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या गौप्यफोटानंतर हाती लागलेले कोलीत घेवून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या सुरक्षित देखरेखीखाली विजय मल्ल्या परदेशात फरार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुध्दा त्यांनी यावेळी केली.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकारांशी बोलताना मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर निशाना साधला. भारत सोडण्यापूर्वी मल्ल्याने अर्थमंत्री जेटली यांची भेट घेतली होती. एवढेच नव्हे, तर आपण लंडनला जात असल्याचेही सांगितले होते. मद्यसम्राट फरार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतरही जेटली यांनी काहीच कारवाई का नाही केली? सीबीआय आणि अन्य संस्थांना अटक करण्याचे आदेश का नाही दिले? असा सवाल त्यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले, अर्थमंत्री नेहमी मोठमोठे ब्लॉग लिहित असतात. मात्र, त्यांनी एकदाही मल्ल्या भेटीचा उल्लेख आपल्या ब्लॉगमध्ये केला नाही. कॉंग्रेसचे खासदार पी. एल. पुनिया यांनी आपल्या डोळ्याने दोघही एका कोप-यात बोलत असल्याचे पाहिले होते. पुनिया याचे साक्षिदार आहेत. परंतु, जेटली यांनी एकदाही या भेटीचा उल्लेख का केला नाही? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

कॉंग्रेसचे नेते पुनिया म्हणाले, माझ्यासमोर अरुण जेटली विजय मल्ल्यांना भेटले. एका कोपऱ्यात उभे राहून दोघांनी चर्चा केली. 1 मार्च 2016 रोजी ससंदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही भेट झाली. या भेटीचे सीसीटीव्ही चित्रीकरणही उपलब्ध आहे, असे पुनिया यांनी सांगितले.

मल्ल्या अर्थमंत्र्याबरोबर संगनमत करुन देशाबाहेर पळून गेला आहे. हे सरकार राफेल, विजय मल्ल्याबाबत खोटे बोलत देशाची दिशाभूल करत आहेत. अर्थमंत्र्यांनीच मल्ल्याला देशाबाहेर पळून जाण्यासाठी मोकळीक दिली. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राहुल यांनी केली आहे.

ऍरेस्ट नोटीसला इन्फरमेशन नोटीसमध्ये बदलले
देशाचे अर्थमंत्री नऊ हजार कोटी रूपयाचे कर्ज बुडविणा-या आरोपीशी चर्चा करतात. मात्र, सीबीआय किंवा ईडीला एक शब्द सांगत नाहीत. एवढेच नव्हे, तर मल्ल्याच्या विरोधात काढला जाणारा ऍरेस्ट नोटीसला इंन्फरमेशन नोटीसमध्ये बदलण्यात आले? हे कार्य तोच व्यक्ती करू शकतो जो सीबीआय सांभाळतो. यामुळे असे करण्याचे आदेश कुणी दिले होते, हे जेटली यांनी देशाला सांगावे, असे राहुल गांधी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)