जेजुरी यात्रेसाठी एस.टी.च्या जादा गाड्या

पुणे, दि. 11 (प्रतिनिधी) – येत्या 21 ऑगस्टला सोमवती अमावस्या आहे. त्यानिमित्त जेजुरी येथे मोठ्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून भाविक श्री खंडेरायाचे दर्शन घेण्यात येतात. त्यामुळे भाविकांना सर्व ठिकाणाहून एस.टी. बसची सुविधा मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 20 आणि 21 ऑगस्टदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी स्वारगेट, हडपसर, सासवड, निरा, शिवाजीनगर, बारामती, शिरूर, नारायणगांव, राजगुरूनगर, तळेगांव, इंदापूर, दौंड, पिंपरी-चिंचवड, बारामती एमआयडीसी या एसटी स्थानकावरून जेजुरी येथे जाण्यासाठी जादा बस सोडण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुणे विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)