जेजुरी बाह्यवळण मार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली

  • जेजुरीत बाधित शेतकऱ्यांसमवेत बैठकीची शक्‍यता

जेजुरी – जेजुरी शहराच्या बाहेरून होऊ घातलेल्या बाह्यवळण मार्गाची होणारी मोजणी बाधित शेतकऱ्यांनी रोखली आहे. यावेळी बाह्यवळण मार्गाबाबत बाधित शेतकऱ्यांशी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी तसेच महसूल अधिकाऱ्यांसमवेत जेजुरीत बैठक होणार असल्याचे शेतकऱ्यांनी संगितले.
आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 वर जेजुरी शहराबाहेरून सहापदरी बाह्यवळण मार्ग होणार आहे. या संदर्भातील 3 फेब्रुवारी रोजी अधिसूचना ही काढण्यात आलेली आहे. त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भूसंपादन करण्यासाठी तशा मोजणीच्या नोटिसा ही शेतकऱ्यांना आल्या आहेत. बाह्यवळण मार्गासाठी सुमारे 330 शेतकऱ्यांची एकूण 83 एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. नोटिसेनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी मोजणीसाठी आले होते. कोणत्याही प्रकारची चर्चा न करता, संमती न घेता मोजणीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाह्यवळणसाठी भूसंपादित केली जाणाऱ्या जमिनीचे बाधित शेतकऱ्यांनी मोजणी करू दिली नाही.
शासनाच्या वतीने भूसंपादन, राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांहनी बाधित शेताऱ्यांशी चर्चा करावी, नकाशा, मार्ग, भूसंपादन कशाप्रकारे होणार, घरे, विहिरी फळबागा नष्ट होणार आहेत. नुकसान भरपाई कशा प्रकारे मिळणार आहे हे बाधित शेतकऱ्यांसमोर मांडावे. शेतकऱ्यांची संमती घ्यावी नंतर मोजणी करावी असा आग्रह नगरसेवक गणेश शिंदे, सचिन पेशवे, मोहन महाजन, नामदेव झगडे, जानबा झगडे, विशाल बारसुडे, दिनेश कोरे, रमेश कोळी, हनुमंत बयास शेतकऱ्यांनी धरला होता. घोषणाबाजी करून शेतकऱ्यांनी मोजणी रोखली. बाधित शेतकऱ्यांची आक्रमक पवित्रा पाहून अधिकाऱ्यांनी ही मोजणी थांबवून शेतकऱ्यांशी बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन देवून निघून गेले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)