जेजुरी-नीरा रोडवर 97 हजारांची अवैध दारू जप्त

तीन जणांना अटक

नीरा- पुणे-पंढरपूर मार्गावर नीरा-जेजुरी दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी (दि. 22) तब्बल 210 लिटर गावठी दारू जप्त केली आहे. तसेच परिसरातील शिवशंभो ढाब्यावर देशी-विदेशी मद्य जप्त करीत तीन आरोपींना अटक केली आहे. या दोन कारवाईत तब्बल 97 हजार 650 रुपयांचा माल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र राजेंद्र कुंभार (रा. शेखमिरेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा), नवनाथ सुरेश यादव, आप्पा आबासो यादव यांना अटक केली आहे. याविषयी उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार, बुधवारी (दि. 21) रात्री नीरा-जेजुरी मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी फोर्ड आयकॉन ही गाडी थांबवून गाडीतील मालाविषयी विचारणा केल्यावर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तपासणी दरम्यान, गाडीच्या मागील डिकीत 35 लिटर क्षमतेची 6 कॅन मिळून एकूण 210 लिटर गावठी दारू आढळून आली. पोलिसांनी तातडीने दारू जप्त करून आरोपी महेंद्र राजेंद्र कुंभार (रा. शेखमिरेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) याला अटक केली आहे.
दरम्यान, आज गुरुवार (ता. 22) रोजी जेजुरी परिसरातील शिवशंभो व शिवमल्हार ढाब्यावर कारवाई केली. यावेळी देशी-विदेशी मद्यासह आरोपी नवनाथ सुरेश यादव, आप्पा आबासो यादव यांना अटक करण्यात आली असून 3 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. कान्हेकर, पी. पी. गवळी, आर. टी. तारळकर, एच. सी. राऊत यांच्या पथकाने कारवाई केली.
तालुक्‍यात सर्रास अवैध दारु विक्री
तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध झुगारून लावत आजही अनेक राज्यमार्गांवरील ढाब्यात, हॉटेलात सर्रास दारूची बाटली पुन्हा उभी राहिली आहे. ग्रामीण भागात गावठी देशी दारू विकली जात आहे. अशा वेळी एक-दोन ठिकाणी कारवाई करून नेमके काय साधणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्पादन शुल्क विभागाने केवळ तक्रारींवर अवलंबून न राहता संयुक्त कालबद्ध कार्यक्रम आखून सर्वच ठिकाणची तपासणी गोपनीय पद्धतीने करण्याची गरज असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)