जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने डस्टबिनचे वाटप

जवळार्जून – जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने मल्हार व्हिला सोसायटीमधील 150 रहिवाशांना ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमात नगरपरिषदेचे गटनेते सचिन सोनवणे, नगराध्यक्षा वीणा सोनवणे, नगरसेवक अरुण बारभाई, गणेश शिंदे, बाळासाहेब सातभाई, नगरसेविका शीतल बयास, रुक्‍मिनी जगताप, विजयकुमार हरिश्चंद्रे, नगरपरिषदेचे प्रकल्प अधिकारी बाळासाहेब बागडे, आरोग्य प्रकल्प अधिकारी राजेंद्र गाढवे, विलास पाटील, पप्पू भोसले, आदिनाथ कर्ण, शबीर तांबोळी, अजित हसबे, गणेश साळुंके, उमेश भोसले व सचिन उपाध्ये आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)