जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे 8 डिसेंबरला उदघाटन

जेजुरी- येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन 8 डिसेंबर रोजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
रविवारी (दि. 2) राज्यमंत्री शिवतारे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. तसेच सर्व प्रकारच्या अद्यावत सुविधांची माहिती घेतली. ज्या उणीवा आहेत त्याबाबत संबधितांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, अधीक्षक डॉ. नामदेव शिंदे, डॉ. शिवराज मुळे, डॉ. प्रसाद खंडागळे, माजी नगराध्यक्ष मनोहर भापकर, शिवसेना शहरप्रमुख महेश स्वामी, पंकज घोणे समवेत आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले की, 2005 साली जेजुरीत ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली. त्यांनतर मी 2009 साली आमदार झाल्यानंतर जेजुरी पालिकेकडून या रुग्णालयासाठी जागा मिळविली. 19 मार्च 2012 साली प्रशाकीय मंजुरी घेऊन पहिल्या टप्प्यात 4 कोटी 18 लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले. 2013 साली रुग्णालयाचे प्रत्यक्ष काम सुरु झाले. दुसऱ्या टप्प्यात 4 कोटी 55 लाख, तिसऱ्या टप्प्यात 3 कोटी 59 लाख रुपये मंजूर झाले. तसेच फर्निचरसाठी सुमारे 1 कोटी 30 लाख रुपये शासनाकडून देण्यात आले. दोन एकर जागेत असलेले रुग्णालय सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. 30 कॉट, एक्‍स-रे मशीन, दंतचिकित्सा, ऑपरेशन थेटर, प्रसुतिगृह, सर्व प्रकारच्या तपासण्या, 24 तास तातडीची सेवा उपलब्ध आहे. रुग्णांच्या सेवेसाठी 28 अधिकारी आणि कर्मचारी असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)