जेजुरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन

जेजुरी – येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेच्या वतीने जेजुरी शहरातून संचलन काढण्यात आले. विजय दशमीला संचलन केले नसल्याने हे संचलन काढण्यात आले. ऐतिहासिक मल्हारराव होळकरांच्या छत्री मंदिरावर शाखा झाल्यावर हातात ध्वज घेऊन गावातील मुख्य रस्त्यावरून संचलन काढण्यात आले. यामध्ये शंभर स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. संचलन मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या घालून व भगव्या ध्वजावर फुले उधळून ग्रामस्थांनी संचलनाचे स्वागत केले. पुरंदर तालुक्‍याच्या विविध भागातून आलेल्या स्वयंसेकांनी मध्ये सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)