जेजुरीत राष्ट्रीयस्तर हॉलीबॉल स्पर्धा

जेजुरी – स्वर्गीय नामदार चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ जेजुरीत बुधवारी (ता. 28) आणि गुरुवारी भव्य राष्ट्रीय स्तरावरील हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जेजुरी हॉलिबॉल क्‍लबच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात असून या स्पर्धेत सुमारे राज्य व राज्याबाहेरील सुमारे 80 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे नगरसेवक अजिंक्‍य जगताप यांनी सांगितले. सुमारे दिड लाख रुपयांची बक्षिसे या स्पर्धेत ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान व कर्नाटकातील संघही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जेजुरी शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत विद्यानगर परिसरातील पटांगणावर या स्पर्धेसाठी बंदिस्त दोन क्रिडांगणे तयार करण्यात आली आहेत. सुमारे आठशे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या निवासाची व भोजनाची सोय करण्यात आली आहे. बुधवारी (ता. 28) रात्री आठ वाजता स्पर्धा सुरु होणार असून त्यानंतर गुरुवारी रात्री जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)