भाजपने केला पालिकेचा निषेध
जेजुरी – साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडाकडे जाण्याच्या वाटेवर मोठा खड्डा खोदून ठेवल्याने अनेक भाविक पाय अडकून पडत आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी पुरंदर भाजपच्या महिला आघाडी प्रमुख अलका शिंदे यांनी या खड्यात वृक्षारोपण करुन पालिकेचा निषेध केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अशोक खोमणे, भटक्या विमुक्त जातीजमातीचे तालुकाध्यक्ष गणेश भोसले, युवामोर्चाचे शहराध्यक्ष विजय पवार, मिलिंद दळवी आदी उपस्थित होते. यावेळी दर्शनाला आलेल्या भाविकांनी रस्त्यातील या खड्ड्यांमुळे होणाऱ्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. गेली काही दिवस रस्त्यात मोठा खड्डा खोदून त्यात लोखंडी पाईप बसवण्यात आला आहे. या खड्ड्यात पाय अडकून पडल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, पालिकेने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. सोमवारी सोमवती यात्रा असल्याने या खड्ड्याभोवती पालिकेने दगडे लावली आहेत. त्यामुळे रस्तावरून ये-जा करण्याऱ्या वाहन चालकांना त्रास सोसावा लागत आहे. येथून पुढे जनतेच्या प्रश्नांबाबत पालिकेला जाग आणण्यासाठी भाजप आंदोलन छेडणार असल्याची माहिती अलका शिंदे यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा