जेजुरीत मिरज-पुणे मालगाडी घसरली

जेजुरी-मिरजहून – पुण्याकडे जात असलेल्या मालगाडीला जेजुरी रेल्वे स्थानकाजवळ अपघात होऊन नऊ डबे रेल्वे रुळावरुन घसरले. हा अपघात सोमवारी (दि.26) दुपारी चारच्या सुमारास झाला. मोठा आवाज झाल्याने आजू-बाजूच्या रहिवाशांनी तेथे गर्दी केली. ही घटना घडताच रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलींद देवूसकर, वरिष्ठ विभागीय अभियंता हेमंत सोनवणे घटनास्थळी हजर झाले. पुण्यावरुन रेल्वे मार्ग दुरुस्त करणारी टूल व्हॅन मागवण्यात आली व तातडीने दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. या मालगाडीला एकूण अडतीस डबे होते व गाडी मोकळी होती.

त्यापैकी नऊ वॅगनच्या नऊ ट्रॉली रुळावरुन खाली घसरल्याने रेल्वे रुळाचे व स्लिपरचे मोठे नुकसान झाले आहे. हा मार्ग बंद पडल्याने कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या कुर्डुवाडी दौंडमार्गे वळवण्यात आल्या तर पुण्याहून गोव्याकडे जाणारी निजामुद्दीन एक्‍स्प्रेसही काही काळ रखडली. रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम वेगात सुरु असून रात्री दोन वाजेपर्यंत काम पूर्ण होईल. या अपघाताची चौकशी करण्यासाठी रेल्वेची तपास समिती येणार आहे. त्यानंतर अपघाताचे कारण समजू शकेल अशी माहिती अभियंता हेमंत सोनवणे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)