जेजुरीत आठवडे बाजार बंद

जेजुरी- मराठा आरक्षणासाठी जेजुरीचा आठवडे बाजार गुरूवारी भरविण्यात आला नाही. त्यामुळे शहरात शुकशुकाट होता. सकाळी मराठा समाजाच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. फक्त मेडिकल, दवाखाने व अन्य अत्यावश्‍यक सेवा सुरू होत्या. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)