जेजुरीत अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू

file photo

जेजुरी- जेजुरी-नीरा रस्त्यावर जेजुरी शहरातील वनविभागाच्या समोरील चढावर शुक्रवारी (दि. 17) रात्री साडेबारा वाजता कार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला.
मृत व्यक्तिचे नाव निलेश रमेश खैरे (वय 32, रा. घाटेवस्ती, कोळविहिरे) आहे. मिळालेल्या माहितीनुसार खैरे दुचाकीवरून कोळविहिरेकडे तर अल्टो कार (एम. एच. 42, एच. 5327) पुण्याकडे जात होती. यावेळी वनविभागाच्या फाटकासमोरील चढाला अल्टो काराने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये खैरे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक विजय वाघमारे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)