जेजुरीचा मल्हारगड देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी

भोर-शहर आणि परिसरात गणेशोत्सवाची धुमधडक्‍यात सुरूवात झाली असून शहरातील गणेश मंडळांमध्ये विविध देखावे सादर करण्याची जणू स्पर्धाच लागली असल्याचे सर्वत्र चित्र पहायला मिळत आहे.
भोर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भोर नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा कल्पना किरवे, माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगर सेविका तृप्ती किरवे, चंचला किरवे, उमा चव्हाण आणि साक्षी किरवे यांनी जेजुरी गडावरील जागरण गोंधळ हा देखावा साकारला आहे. भोरमधील गणेशोत्सवाचे हा देखावा मुख्य आकर्षण ठरत असून देखावा पाहण्यासाठी भोर आणि पंचक्रोशितील नागरीक महिला रांगा लावत आहेत. म्हाळसा, बानु आणि मल्हार देव यांच्या लक्षवेधी प्रतीमांबरोबर तळीभंडारा, जागरण गोंधळ, लंगर तोडणे, वाघ्या मुरळी, शिळारुपी म्हाळसा, दीप माळ, खंडोबा मंदिराच्या 33 लाख पायऱ्या हे सारे हलते देखावे पाहताना प्रत्यक्षात जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरातच गेल्याचा भास गणेश भक्तांना होत आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती आणि समोर श्री गौरीच्या मूर्ती या देखाव्याचे सजावटीत भरच टाकत आहे. हा देखावा साकारण्यासाठी किरवे कुटुंबीयांना 15 दिवस मोठी मेहनत घ्यावी लागली. किरवे कुटुंबीय गेल्या 11 वर्षांपासून दिवंगत हभप बाप्पूराव किरवे, वासुदेव किरवे यांचे प्रेरणेतून धार्मिक परंपरेतून गणेशोत्सव साजरा करत असून 12 महिन्यांचे बारा सण, गोवर्धन, अमरनाथ यात्रा, पृथ्वी प्रदक्षिणा, वृंदावन गार्डन, संत जगनाडे महाराज यांसारखे देखावे साकारले असल्याचे कल्पना, तृप्ती व चंचला किरवे यांनी आवर्जून सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)