‘जेएसपीएम’मध्ये रंगणार ‘इनोव्हिजन’ स्पर्धा

पिंपरी – जेएसपीएम संस्थेच्या ताथवडे शैक्षणिक संकुल येथे दि. 10 व 11 जानेवारी रोजी इनोव्हिजन-2019 या सामाजिक-तंत्र विषयातील स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राकेश जैन यांनी दिली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख आणि उद्योजक अनिर्बन सरकार उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याबरोबरच सामाजिक जाणिवांना सुद्धा आव्हान दिले जाते. यावर्षी मिलेनियम ही इनोव्हिजनची मध्यवर्ती संकल्पन आहे. मॉडेल मेकिंग, ऍड मॅनिया, मूव्हि मेकिंग सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ड्रोन मॅनिया, रोबोवॉर पेपर प्रेझेन्टेशन, ऍप्टिट्यूड क्रॅकर, वेब स्ट्रक्‍ट, डेटाथोन, लेथ वॉर, सर्किट मेकिंग, फार्मा क्रॅकर आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. डॉ. एम. एम. पुरी, ताथवडे संकुलाचे कार्यकारी संचालक प्रा. सुधीर भिलारे, रवी सावंत, उपप्राचार्य प्रा. ए. एस. देवस्थळी, डॉ. अजय पैठणे, डॉ. आनंद देशमुख, डॉ कराळे, विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा जोगदंड, प्राची भोसले, जिग्नेश पाटील, अमोल सोनकांबळे यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)