जेएन पेटीट, लॉयला स्कूल संघांना विजेतेपद

विद्याभवन करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा

पुणे: जेएन पेटीट आणि लॉयला स्कूल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या विद्या भवन स्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालय तर्फे आयोजित विद्याभवन करंडक आंतरशालेय फुटबॉल (14 आणि 16 वर्षाखालील गट) स्पर्धेत आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले.

-Ads-

विद्या भवन हायस्कूलच्या मॉडेल कॉलनी मैदानावर झालेल्या स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात जेएन पेटीट संघाने लॉयला स्कूल संघाचा 1-0 असा सहज पराभव केला. 6 व्या मिनिटाला जेएन पेटीटच्या तुशार वर्मा याने निर्णायक गोल करून संघाला विजेतेपद मिळवून दिले.

तर, 16 वर्षाखालील गटामध्ये लॉयला स्कूल संघाने विद्या भवन संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. तिसर्या मिनिटाला लॉयला स्कूलच्या अव्देत शिंदे याने एकमेव गोल करून संघाला विजेतेपद मिळवून दिले.
16 वर्षाखालील गटात विद्याभवनच्या ऋषीकेश मेणकुदाळे याला सर्वोत्कृष्ट गोलरक्षक आणि विद्या भवनच्या श्रेयस जगताप याला सर्वाधिक गोल करणारा खेळाडू सा मान मिळाला. 14 वर्षाखालील गटात जेएन पेटीटच्या अमन शेख याला सर्वाधिक गोल करणारा खेळाडू तर, लॉयलाच्या बाजरा थत्ते याला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा मान देण्यात आला.

स्पर्धेचा सविस्त निकालः 14 वर्षाखालील गटः
1) जेएन पेटीटः 1 (तुशार वर्मा 6 मि.) वि.वि. लॉयला स्कूलः 0;
16 वर्षाखालील गटः
1) लॉयला स्कूलः 1 (अव्देत शिंदे 3 मि.) वि.वि. विद्या भवनः 0;


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)