जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा संसदेवरील मोर्चा पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे

नवी दिल्ली : दिल्लीतील  जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी हजेरीच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी आहे त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा जेएनयूकडून देण्यात आला. त्यानंतर जेएनयूचे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सगळ्याचे मूळ प्राध्यापक अतुल जोहरी यांच्यासोबत झालेल्या वादात आहे.

अतुल जोहरी हे जेएनयूमध्ये प्राध्यापक आहेत त्यांनी काही मुलींना अश्लील इशारे केले तसेच अश्लील शेरेबाजी केली असा आरोप करत या विद्यार्थ्यांनी चार दिवसांपूर्वीच वसंतकुंज पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली. तसेच  त्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली. ९ मुलींनी प्राध्यापक अतुल जोहरी यांच्याविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मात्र जोहरी यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज दिला, या अर्जानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे हे आंदोलन इतके चिघळले की त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केला. वसंतकुंज पोलीस ठाण्यासमोर जेव्हा अशाच प्रकारे विद्यार्थी अडून बसले होते तेव्हाही पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला होता. जेएनयूतील हजेरीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. दिल्लीत संसदेसमोर जाऊन या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)