जेएनयुच्या पदवीदान सोहळ्यावर विद्यार्थी संघटनेचा बहिष्कार

नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने या विद्यापीठाच्या 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पदवीप्रदान सोहळ्यावर बहिष्कार घोषित केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू जगदीशकुमार हे विद्यार्थ्यांचे नैसर्गिक हक्क डावलत आहेत असा आरोप करून या संघटनेने हा बहिष्कार घोषित केला आहे. गेल्या वर्षी विद्यापीठाने तब्बल 46 वर्षांच्या अवधीनंतर पदवीप्रदान सोहळा पुन्हा सुरू केला होता. यावर्षी सलग दुसऱ्यांदा हा सोहोळा होत असून यावेळी पीएचडी मिळालेल्या विद्यार्थ्यांना पदव्या दिल्या जाणार आहेत. पण या सोहोळ्यावर संघटनेने बहिष्कार घोषित केला आहे.

विद्यार्थी संघटनेचा असा आरोप आहे की सतत गेली अडीच वर्षे कुलगुरू जगदीशकुमार यांनी पद्धतशीरपणे प्रयत्न करून विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थ्यांच्या हालचालींवर मर्यादा आणल्या आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे अनेक निर्णय घेतले असून दंड व अन्य शिक्षा विद्यार्थ्यांना सातत्याने केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश मर्यादित करणे, राखीव जागा न भरणे, मनमानी पद्धतीने फीवाढ करणे अशा प्रकारे त्यांनी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचेच काम केले असून त्यांच्या निषेधार्थ आम्ही हा बहिष्कार घोषित केला आहे असे विद्यार्थी संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)