नीरा – हिंदुस्थान फिड्डस बारामती कॅटल फिड्डस प्रा. लि यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच शिक्षण दिनाचे औचित्य साधून वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने कालिदास पवार व महेश साळुंके यांच्या सह अन्य शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिवदत्त दूध डेअरी जेऊर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तम धुमाळ, दत्तात्रय धुमाळ, शिवदत्त डेअरी चेअरमन चंद्रकांत धुमाळ, संकेत गायकवाड, हिंदुस्थान फिड्डसचे अधिकारी रुपेश भोईटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक बिभीषन जाधव केले. सूत्रसंचालन चौरंगनाथ कामठे यांनी केले तर आभार सुधाकर सोनावणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)