जेऊर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

नीरा – नीरा नजिक जेऊर येथील शेतकरी मोहन पांडुरंग तांबे (वय 42) यांनी राहत्या घरात सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तांबे याच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा गावात असून, पुढील सत्य तपासाअंती स्पष्ट होईल.

तांबे याचे कुटुंब नुकतेच विभक्त झाले होते. आत्महत्येपूर्वी ते तणावात असल्याचे त्यांनी मित्रांना सांगितले होते. याबाबत “टोकाचा विचार करू नको,’ असा सल्ला त्यांना मित्रांनी दिला होता. त्याचबरोबर त्यांच्या वाट्याला आलेल्या अल्पशा जमिनीतून आळंदी पंढरपूर मार्गातील नीरा बायपास रस्ता जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळेही ते चिंतित होते असेही बोलले जात आहे. तांबे यांच्या आत्महत्येचे नक्की कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांच्या पाठीमागे आई, दोन मुले व पत्नी असा परिवार आहे. याबाबत रात्री उशिरा खबर देण्यात आली असून जेजुरी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)