“जेईई मेन आणि नेट’साठी आधारकार्डाची अट काढली

पुणे – विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत सहायक प्राध्यापक पदांसाठी होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात “नेट’ परीक्षा आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या “जेईई मेन’ परीक्षेसाठी अर्ज भरताना आधारची सक्‍ती नसल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा राष्ट्रीय स्तरावर नेट परीक्षा पहिल्यादांच ऑनलाइनद्वारे घेण्यात येत आहे. या परीक्षेविषयी उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी या परीक्षेच्या नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्‍यक असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे, उमेदवारांमध्ये चितेंचे वातावरण होते. त्या पार्श्‍वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षेसाठी आधारसक्ती नसल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी नोंदणी करताना आधारकार्डची सक्‍ती ही अट नियमावलीतून काढून टाकले आहे.

नेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. 9 ते 23 डिसेंबर दरम्यान ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेसाठी अन्य ओळखपत्राचा पुरावाही ग्राह्य धरले जाणार आहे. त्याविषयी सविस्तर माहिती नॅशलन टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

दरम्यान, “नेट परीक्षेसाठी ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल, असे उमेदवार परीक्षेच्या अर्जनोंदणीसाठी आपला पासपोर्ट क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, बॅंकेचा खातेक्रमांक किंवा याव्यतिरिक्त कुठल्याही सरकारी ओळखपत्रावरील क्रमांक अर्जात भरू शकतात. हेच निकष जेईई मेन परीक्षेसाठी देखील लागू असतील, असेही नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)