video: जेंव्हा एकत्र येतात जगातील सर्वात उंच आणि लहान व्यक्ती….

नवी दिल्ली : जगातील सर्वात कमी उंचीची महिला भारतात आहे. ज्योती अमागे ही नागपूरची रहिवासी आहे. 24 वर्षीय ज्योतीची उंची दोन फुट सहा इंच आहे. ज्योतीने नुकतीच जगातील सर्वात उंच व्यक्ती सुलतान कोसेनेची भेट घेतली. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले. सुलताना कोसेनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. ज्यांची उंची आठ फुटांपेक्षा जास्त आहे अशा लोकांच्या यादीत सुलतानचे नाव आहे. सुलतान यांनी २००९ मध्ये जगातील सर्वात उंच व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. दरम्यान, ज्योतीला एकोंड्रोप्लेसिया असल्यामुळे तिची उंची वाढलीच नाही. तिची उंची दोन वर्षाच्या मुलाच्या उंचीपेक्षा देखील कमी आहे. पण तिने आपल्यातील कमतरतेवर मात करत हीच आपली ताकद बनवली आणि सर्वत्र नाव कमावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)