जॅकी चॅनच्या मुलीचा मैत्रिणीशी विवाह

हॉलिवूडचा अॅक्‍शन, कॉमेडी स्टार जॅकी चॅनच्या मुलीने तिच्या एका मैत्रिणीबरोबर लग्न केले आहे. एटा एन जी असे जॅकीच्या मुलीचे नाव आहे. तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या एंडी ऑटम नावाच्या मैत्रिणीबरोबर तिने लग्न केल्याचे नुकतेच समजले आहे. त्यांनी सोशल मिडीयावर आपल्या जोडीदारीणीबरोबरचे फोटो आणि मॅरेज सर्टिफिकेट शेअर करून ही अधिकृत घोषणा केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला या दोघींनी कॅनडात जाऊन लग्न केले.

या दोघीजणी गेल्या वर्षभरापासून एकमेकींना डेट करत होत्या. जॅकी आणि त्याच्या कुटुंबीयांकडून मात्र आपल्या मुलीच्या या समलैंगिक विवाहाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. जॅकी चॅन आणि त्याचे सर्व कुटुंबीय एटाच्या या समलैंगिकतेबाबत खूपच चिंतातूर होते. वर्षभरापूर्वीपासून जॅकीने आपल्या मुलीला समजावण्याचा आणि तिचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही केला होता. पण एटा ऐकायला तयार नव्हती. म्हणून जॅकीने तिला घरातून हाकलूनच दिले होते. त्यानंतर एटा आणि तिची मैत्रिण एंडी या हॉंगकॉंगमध्ये एका पूलाखाली रहात होत्या. त्यांच्याजवळ खायलाही पैसे नव्हते. या स्थितीला आपले पालकच जबाबदार असल्याचे एटाने म्हटले होते.

एटा ही पूर्वाश्रमीची ब्युटी क्‍वीन एलायना एन.जी.ची मुलगी आहे. एलायनाबरोबर जॅकी चॅनचे अफेअर होते. मात्र त्या दोघांनी कधीच लग्न केले नाही.

एंडीने एटाबरोबरचे फोटो शेअर करताना एक कॅप्शनपण लिहीली आहे. “आम्ही दोघी आता हॉंगकॉंगला परत येत आहोत.,प्रेमाने आमचे डोळे आता उघडले आहेत. मी माझ्या भावना व्यक्‍त करू शकत नाही. आता मला कशाचीही भीती वाटत नाही. लहानपणापासून मला असे वाटायचे की माझ्यामध्ये खूप द्वेषभावना भरलेली आहे. पण मला निगेटिव्हीटीने घेरले होते, याची जाणीव मला एटाने करून दिली.’

एटानेही सोशल मिडीयावरच्या आपल्या फोटोबरोबर एक क्‍युट मेसेज लिहीला आहे. प्रेमाचा विजय होतो, असे तिने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)