जॅकलीन-सलमानची बाईक राईड…

अभिनेता सलमान खान आगामी चित्रपट “रेस 3’च्या शूटींगसाठी सध्या जम्मू-काश्‍मीरमध्ये आहे. याचवेळी त्याने बाईक सफारी केली. त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही होती. जम्मूच्या कारगिल भागात सलमान बाईकवर फेरफटका मारत होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सलमान खान तीन वर्षानंतर पुन्हा काश्‍मीरला गेला आहे. यापूर्वी त्याने “बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचे चित्रिकरणही येथे करण्यात केले होते. त्यानंतर आता “रेस 3’च्या शूटींगसाठी सर्व स्टार कास्ट जम्मूच्या सोनमर्गमध्ये पोहचले आहेत. सोनमर्गमध्ये एका रोमॅंटिक गाण्याचे शूट करण्यात येणार आहे. सलमान खानने निर्माता रमेश तौरानी आणि बॉडीगार्ड शेराही सोबत नुकतीच जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचीही भेट घेतली.

दरम्यान, सलमानने शुक्रवारी ट्‌विटर अकाऊंटवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत त्यावर “रेसिंग हार्टस’ असे लिहिले. सोबत त्याने चित्रपटातील अन्य जणांचे फोटो टॅग केले. या पोस्टरच्या बॅंकगाऊंडमध्ये लाईट्‌स आणि कार दिसून येत आहे. यात जॅकलीन बॅकलेस टॉपमध्ये सलमानच्या खांद्यावर हात ठेवून दिसत असून सलमानच्या हातात बंदूक दिसते. या चित्रपटात सलमानशिवाय बॉबी देओल, अनिल कपूर, डेजी शाह आणि साकिब सलीम असे स्टार कलाकार झळकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)