जॅकलीन फर्नांडिस पहिल्यांदाच ऍक्‍शन रोलमध्ये

“अ जंटलमन, सुंदर, सुशील, रिस्की’या आगामी चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस पहिल्यांदाच ऍक्‍शनच्या रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातल्या जॅकलीनच्या रोलचा एक व्हिडीओ निर्मात्यांनी नुकताच रिलीज केला. त्यातली जॅकलीनची ऍक्‍शन बघितली की आश्‍चर्यचकित व्हायला होते. जॅकलीनला प्रेक्षकांनी आतापर्यंत सेक्‍सी रोलमध्येच बघितले होते. मात्र अगदी जीवावर उदार होऊन केलेले ऍक्‍शन स्टंट करतानाची जॅकलीन पहिल्यांदाच आपल्याला दिसणार आहे.

या चित्रपटातून आपल्याला पहिल्यांदाच बंदूक हाताळायला मिळाली, म्हणून मी स्वतःला भागवान समजते, असे जॅकलीन म्हणते. आश्‍चर्य म्हणजे आतापर्यंत एकदाही बंदूक न हाताळलेली जॅकलीन “जंटलमन…’मधून एकाचवेळी दोन्ही हातात बंदूका घेऊन “फायरिंग’ करताना दिसणार आहे. हा चित्रपट एका गैरसमजूतीच्या कथानकावर आधारलेला असणार आहे. जॅकलीनच्या बरोबर सिद्धार्थ हिरो म्हणून असेल. त्यांची “ऑनस्क्रीन’ केमिस्ट्री आणि ऍक्‍शनचा धमाका हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य असणार आहे. जॅकलीनचा हा ऍक्‍शन फंडा आणखी काय काय रंग दाखवणार आहे, हे या चित्रपटाचे आणखी व्हिडीओ, ट्रेलर आणि टीजर रिलीज झाल्यावर समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)