जून महिन्यात मोदी-जिनपिंग द्विपक्षीय बैठक

बीजिंग (चीन) एससीओ (शांधाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन) शिखर परिषदेसाठी पंतप्रधान जून महिन्यात चीनल भेट देणार आहेत. त्या वेळी त्यांच्यात आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होणारच असल्याची माहिती भारताचे राजदून गौतम बंबवाले यांनी दिली आहे. हॉंगकॉंगमधील एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले. चीनमधील क्विंगडाओ या शहरात 9 आणि 10 जूनला एससीओ शिखर परिषद होणार आहे. नाटो ला टक्कर देणारी संस्था म्हणून एससीओकडे पाहिले जात आहे.

जूनमध्ये भारताचे पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष यांच्यात द्विपक्षीय बैठक होणारच आहे, असे स्पष्ट करून बंबवाले पुढे म्हणाले, की तत्पूर्वी येत्या काही आठवड्यात आणि महिन्यात आम्हाला इतर अनेक बैठका घ्यायच्या आहेत. त्यात दोन्ही देशांच्या सीमा अधिकाऱ्यांच्याही बैठका होणार असून खुल्या आणि प्रामाणिक चर्चांसाठी या बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर जाणार असल्याचे सूचित केले आहे. एससीओ देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्याही एससीओपूर्वी बैठका होणार आहेत,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले सध्या चीन मधील परिवर्तन पाहता श्री मोदींची भेट हि श्री अटलबिहारी बाजपेयी ह्यांच्या पाकिस्तान भेटीची पुनरावृति होऊ नये असे वाटते कारण श्री बाजपेयी पाकिस्तानला गेले आणि कारगिल प्रकरण घडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)