जुळे पाझर तलावांनी गाठला तळ

कुरवंडी गावातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण

पेठ- कुरवंडी (ता. आंबेगाव) येथील कोटमदार घाटातील दोन जुळे पाझर तलावांनी सध्या तळ गाठला आहे. सातगाव पठार परिसरातील नागरिकांची वनवण सुरू आहे. तसेच जनावरांनाही पाणी पिण्यास मिळणे कठिण झाले आहे.

कुरवंडी व कोल्हारवाडी गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या कुरवंडी घाटातील तलाव आटत चालले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजना सध्या कोलमडली आहे. त्यामुळे सातगाव पठारावरील कुरवंडी, कोल्हारवाडी, मतेवाडी व गटेवाडी या गावांना कुठल्याही योजनेतून पाणीपुरवठा होत नाही. पठारावर सध्या पाण्यासाठी वनवण सुरू आहे. परिसरातील शेतकऱ्यांना बटाटा पीक जगविण्यासाठी टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. येथील नागरिकांना कुरवंडी घाटातील तलावातील पाणीसाठा संपत आल्याने गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या वर्षी कमी पाऊस पडल्याने प्रशासनाने टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)